व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली संकुलात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
चिकली संकुलातील इंद्रायणी वजन काटाट्याजवळ असलेल्या घरात महिलेचा मृतदेह आढळून आला. या घरात महिला एकटीच राहत होती आणि पतीपासून वेगळी राहत होती, असे सांगण्यात येत आहे. महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पुढील तपास सुरू केला. मात्र, महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Discussion about this post