पिंपरी चिंचवड़ | (व्हीएसआरएस न्यूज) | भाजपा महिला मोर्चा भोसरी चन्होली मंडलाच्या वतीने प्रदेशध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार, लोकप्रिय आमदार शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ” सुषमा स्वराज पुरस्कार” सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावर्षीचा महिला दिन सुषमा स्वराज यांना समर्पित करत भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सौ. कविता भोंगाळे – कडू व भोसरी चन्होली मंडल अध्यक्षा सौ. गीताताई महेंद्रु वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात शहरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या सौ. स्वाती बेंद्रे, डॉ. सारीका लोंढे, साधना गडसिंग, जयश्री सोनवणे, कविता स्वामी आदी महिलांना ” सुषमा स्वराज पुरस्कार देत गौरविण्यात आले. तसेच यावेळी महिलांसाठी मनोरंजनाच्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणुन पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. उज्वलाताई गावडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा सरचिटणीस सौ. कविता भोंगाळे – कडू यांनी केले व आभार भोसरी चन्होली मंडल अध्यक्षा सौ. गीताताई महेंद्र यांनी मानले.
या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. राजश्रीताई जायभाय, पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस सौ. दिपालीताई धनोकार, शहर उपाध्यक्ष रोहिणीताई मांढरे, उपाध्यक्ष सौ. जयश्रीताई खरमाडे निगडी चिखली मंडळाध्यक्ष सौ.कवितालाई हिंगे, पिं.चिं. सोशल मीडिया प्रमुख सौ. हीनाताई मुलानी, भोसरी चहोली मंडल सरचिटणीस सौ. सुरेखाताई पांचाळ, सौ.चित्राताई अभंग उपाध्यक्ष सौ. कल्पनाताई पाटील, सौ. स्वातीताई शिर्के, सौ. मनीषा गंगणे, व सर्व मंडल पदाधिकारी व प्रभाग अध्यक्ष, प्रभाग कार्यकारणी आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Discussion about this post