व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द करण्यात आली.
वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (गुरुवारी) काढले आहेत. दरम्यान, दहा दिवसांतच झगडे यांची नियुक्ती रद्द झाली असून त्या महापालिकेतच उपायुक्त पदावर कार्यरत राहतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यकर विभागाचे आणि वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली असून त्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे.
Discussion about this post