पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली. देहूरोड पोलिसांच्या गस्ती पथकाने दोघा सराईत दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी एक मोबाईल जप्त केला. बुध्ददेव बिष्णु विश्वास (वय २४), देवाशिष मधुसुदन बिश्वास (वय २३, सध्या रा. सांगवी, पुणे मुळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपीकडून चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. देहूरोडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या आदेशानुसार हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले यांना एक केटीएम ड्युक दुचाकीस्वारील दोन व्यक्तींवर संशय आला.
त्या दोघांची चौकशी करत असताना त्यातील एकजण पळून गेला. त्यामुळे गोवले यांनी पथकातील अन्य कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावून एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक दिंगबर अतिग्रे यांनी पळून गेलेल्या इसमाच्या मोबाईल नंबरवरून तांत्रीक विश्लेषण केले असता तो संशयीत इसम कल्याण येथे गेला असल्याचे समजले. त्यानुसार अतिग्रे यांनी कल्याण रेल्वे स्टेशन येथे पोलीस पथक रवाना केले.
या पथकाने कल्याण रेल्वे पोलिसांच्या मदतीने संशयीतास शिताफीने ताब्यात घेतले. देहूरोड पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता एक केटीएम ड्युक, दोन बुलेट, एक हिरो पॅशन, अॅक्टीव्हा, अशा एकूण पाच दुचाकी व एक मोबाईल फोन साथीदारासह चोरल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.
Discussion about this post