व्हीएसआरएस मराठी न्युज -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
धनखड यांना 528 तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 725 मतं पडली. त्यापैकी 710 मतं वैध तर 15 मतं अवैध आढळून आली. आता जगदीप धनखड हे देशाचे 14 वे उपराष्ट्रपती असतील. धनखड देशाचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्टला शपथ घेतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
Discussion about this post