व्हीएसआरएस मराठी न्युज -कॉग्रेसअध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडते आहे. पाठिमागील 24 वर्षांमध्ये कँग्रेस पक्ष अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नव्हती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहेत.
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. भारत जोडो यात्रेसाठी कर्नाटकमध्ये एक विशेष बूथ तयार करण्यात आला आहे. ज्यात माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येईल. खरगे आणि थरूर हे दोन दावेदार कर्नाटक आणि केरळ या त्यांच्याशी संबंधित राज्यांमध्ये मतदान करणार आहेत.
मतदान संपल्यानंतर, मतदानाच्या कुलीपबंद (सीलबंद) पेट्या दिल्लीला मंगळवारी
नेल्या जातील. मतमोजणीसाठी उघडण्यापूर्वी या पेट्या दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवले जातील, असेही मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.
बुधवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व मतपत्रिका एकत्र केल्या जातील. ज्याला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतील तो काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडला जाणार आहे.
Discussion about this post