व्हीएसआरएस मराठी न्युज –
पिंपरी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि अण्णा बनसोडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना चांगलेच उधाण आले आहे.
अण्णा बनसोडे हे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामर्थ्यशाली नेते आहेत. २००९ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास राहिला आहे. या काळात अजित पवारांच्या जवळचा नेता म्हणून बनसोडे ओळखले जाऊ लागले होते. मात्र, गेल्या काही काळात अजित पवार आणि अण्णा बनसोडे यांच्यात दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे.
Discussion about this post