व्हीएसआरएस न्युज दरवर्षी थंडीच्या काळात केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येतात.
या सहा महिन्यांच्या काळात भगवान केदारनाथ यांचा निवास उखीमठ येथे असतो. या ठिकाणी त्यांची पूजाअर्चना करण्यात येते.
केदारनाथ मंदिरात शनिवारी पूजाअर्चना केल्यानंतर केदारनाथ यांची पालखी फूलांनी सजवण्यात आली. आर्मी बँडच्या गजरात ही पालखी 6 महिन्यांसाठी उखीमठ येथील ओमकारेश्वर मंदिराकडे रवाना झाली. आता सहा महिने उखीमठ येथे केदारनाथ यांची पूजा अर्चना होणार आहे. या पालखीसोबत अनेक भक्तही आहेत.
केदारनाथ यांच्या पालखीचा पहिला रात्रीचा मुक्काम रामपूरला असेल. तर दुसरा मुक्काम गुप्तकाशीमध्ये होईल. त्यानंतर 8 नोव्हेंबरला पालखी उखीमठ येथील ओमकारेश्वर मंदिरात पोहचेल. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथ यांच्या मंदिराचे दरवाजे शनिवारी थंडीच्या काळामुळे सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आले. भाऊबीजेच्या मुहूर्तावर सकाळी 8.30 मिनिटांनी विधीवत मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती देवस्थान बोर्डाच्या पुजाऱ्यांनी दिली. केदारनाथमध्ये शुक्रवारी हिमवृष्टी झाल्यानंतर भाविकांनी परतीला सुरुवात केली.
Discussion about this post