व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –पिंपरी-चिंचवड । व्हीएसआरएस न्यूज । विशेष प्रतिनिधी ।
‘ॐ त्रयाम्बकम यजामहे सुगंधिम पुष्टि वर्धनम, उर्वरुकमिवा बन्धनात मृत्योर मुक्षीय मामृतात’, ‘ॐ नम शिवाय, ‘हर हर महादेव’ या मंत्रांचा नाद मंगळवारी पहाटेपासूनच मंदिरात घुमत होता. हर बोला हर हर महादेव.. असा जयघोष करीत आकुर्डी येथील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शनखाली आकुर्डी स्थित महादेव मंदिर येथे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. केळी व दूध वाटप करण्यात आले.
शहरातील विविध महादेव मंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर अनेकांनी दुग्धाभिषेक केला. तसेच खास वाती प्रज्वलित करून शंकराच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करुन मनोभावे प्रार्थना केली. शहरातील शिवधाम मंदिर याशिवाय शहरातील अनेक मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासून ये-जा सुरू होती. दर्शनासाठी भाविकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर मंदिरांमध्ये दिसून आला. यानिमित्त शहरातील मंदिरांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रम, शंकराची गाणी, नामधुन यामुळे शिव शंभुमय वातावरणाची निर्मिती झाली होती. यावेळी डॉ. पंकज गुप्ता, राहुल गुप्ता, अतुल शितोळे, अजित देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्रम शेख,प्रमोद गुप्ता यांनी प्रयत्न केले.
महारुद अभिषेक, होमहवन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांनी शहरातील विविध शिवमंदिरामध्ये आयोजित करण्यात आले होते. शहरातील शिवमंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती तसेच, फुलमाळांनी मंदिरे सजविण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण दिसून आले.
ठिकठिकाणी प्रसाद वाटण्यासाठी धार्मिक संस्थानी स्टॉल्स उभारलेले होते. याशिवाय बेल रोपांच्या विक्रीचे स्टॉलही लावण्यात आले होते. शहरातील चिंचवड गावातील धनेश्वर, पिंपरीगावातील तपोवन, मोहननगर येथील महादेव मंदिर, पिंपळेगुरव, सांगवी, भोसरी, मोहननगर, फुगेवाडी, आकुर्डी येथील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
• महाशिवरात्रीनिमित्त विविध महादेव मंदिरात सकाळपासून रुद्राभिषेक, पारायण, भजन, कीर्तन आदी हर बोला हर हर महादेव… असा जयघोष करीत विविध शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त विविध महादेव मंदिरात सकाळपासून रुद्राभिषेक, पारायण, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
Discussion about this post