व्हीएसआरएस मराठी न्युज –भोसरी, दि. ३० (अक्रम शेख) – उत्तर भारतीय बांधवांनी आज (रविवारी) मोठ्या उत्साहात पारंपारिक पध्दतीने शहरात छट पुजा साजरी केली. पुजेसाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विश्व श्रीराम सेना तर्फे डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली मोशी येथील इंद्रायणी घाट येथे आयोजित केलेल्या छट पुजेसाठी रहाटणी, चाकण, आळंदी, मोशी, चिखली, चिंबळी, चिंचवड, आकुर्डी अशा विविध भागातील उत्तर भारतीय बांधव सहभागी झाले होते.
यावेळी महामंडेश्वर स्वामी प्रवानंद सरस्वती , सुरेश चव्हाणके,शाम महाराज , माजी महापौर नितिन काळजे, राहुल जाधव,मा नगरसेवक धनंजय आल्हाट,मा मंत्री अमित गोरखे, विश्व श्रीराम सेनेच असंख्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
सूर्य मावळाताना गंगेची आरती व पूजन करुन छट पूजेला सुरुवात झाली. उस, नारळ, केळी, डाळिंब, पेरू हे भळे ठेवून देवाची पूजा करण्यात आली. महिलांनी छटमातेचे गीत गाऊन देवाला पाण्याचा प्रथम अर्ग देण्यात आला. भोजपुरी गायक संजय सम्राट यांनी सांस्कृतीक व भक्तीगीत कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
प्रमोद गुप्ता ,शामबाबू गुप्ता , अक्रम शेख, विक्रम मीना, इनोबी सिंहा, परवेझ चौधरी,जितेंद्र गुप्ता, डॉ. पंकज गुप्ता, मंगेश लटके, राहुल गुप्ता, विकास प्रसाद, राजकुमार सिंह, माधव गुप्ता, मुन्ना सिंह यांनी संयोजनात पुढाकार घेतला.
सुत्रसंचालन आकाश मोरे यांनी केले.
Discussion about this post