व्हीएसआरएस न्युज पुणे- पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प उभारण्याचा निर्णय मनपा स्थायी समितीने घेतला आहे. याबाबत समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगरसेवक अर्चना पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता.
रासने म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. हडपसरपासून 20 किलोमीटर अंतरावरील पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा शंभुराजेंनी सक्षमपणे सांभाळली.
अनेक मोहिमा यशस्वी केल्या. प्रजाहितदक्ष राजा अशी त्यांची ओळख होती. संभाजी महाराजांचे अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य हे गुण विशेष होते.
त्यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
या कार्याचे यथोचित स्मरण व्हावे, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने पुरंदर किल्यावर भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.’
Discussion about this post