व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी कोरोना व्हायरस संकटाचा परिणाम फिल्म इंडस्ट्रीवर देखील झाला. सिनेमागृह बंद असल्याने अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले.
तर अनेक सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. यापैकी एक सिनेमा म्हणजे सलमान खान चा बहुचर्चित सिनेमा ‘राधे’. हा सिनेमा मागील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार होता. परंतु, कोविड-19 लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. मात्र ईद 2021 च्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलजी होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली.
तर आज निर्मात्यांनी सिनेमाबद्दल नवी घोषणा केली आहे. थिएटर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स दोन्ही माध्यमातून हा सिनेमा रिलीज होणार आहे, असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
ईदच्या रिलीजची परंपरा लक्षात घेऊन सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमासाठी मेगा रिलीजची योजना आखली आहे. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर थिएटर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर 13 मे 2021 रोजी प्रदर्शित होईल.