व्हीएसआरएस मराठी न्युज -कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेक जणांचे बळी गेले ही घटना खूपच मनाला लागून राहिली वृक्षसंवर्धन केले तर ऑक्सिजन मोफत मिळतो अन् आरोग्याची प्रकृती उत्तम राहते या भावनेतून आकुर्डीत कैलास कुटे मित्र परीवार यांच्या वतीने ११०० तुळस रोप वाटप करण्यात आले.
तुळशीचे रोप लावू दारी लक्ष्मी सोबत आरोग्यही लाभेल घरोघरी
पर्यावरण रक्षण व आयुर्वेद संवर्धन2021
माननीय श्री.लक्ष्मणभाऊ जगताप व माननीय श्री.महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकैलास गणपत कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयमध्ये तुळशी विवाह निमित्त दिनांक 15/11/2021 रोजी तुळशी रोप वाटप उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमांमध्ये 1100 तुळशीची रोप आकुर्डी मधील नागरिकांना वाटप करण्यात आले तसेच त्यासोबत तुळशीचे आयुर्वेदिक गुणधर्म व फायदे यासंबंधी मार्गदर्शन देखील देण्यात आले.
या राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी कौतुक केले असून वृक्षांचे उत्तमरित्या संर्वधन करणार असल्याचे अभिवचन दिले. निसर्गातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा, वृक्षांपासून पासून मिळणारा नैसर्गीक ऑक्सिजन सर्वांना मोफत मिळावा म्हणून हा उयक्रम राबविल्याचे कुटे यांनी सांगितले.
Discussion about this post