व्हीएसआरएस न्युज आकुर्डी संरक्षण दलातील सेवानिवृत्त अधिकारी व ईसीए Eca यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर उद्यान आकुर्डी येथे औषधी वनस्पती लागवड करण्यात आले.
औषधी वनस्पती लागवड करण्याचा उद्देश असे की बागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्या उपलब्ध सोप्या मार्गाने व्हावेत व औषधी वनस्पतीची ओळख व्हावी . पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक उद्यानात हा उपक्रम नजीकच्या काळात पर्यावरण संवर्धन समितीकडून राबविण्यात येणार आहे .संत ज्ञानेश्वर उद्यानात प्रथम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे .अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे .या उपक्रमाला वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य सुरेश जी वाडकर व हिरामण भुजबळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सेवानिवृत्त संरक्षण अधिकारी श्री .दत्तात्रय कुलकर्णी डॉ आशा राव श्री. हिरामण भुजबळ सदस्य वृक्ष प्राधिकरण समिती प्राचार्य मोरे विद्यालय सौ तेजाली देसरडा ,शिक्षिका सौ.विजया दांगट , शिक्षिका सौ प्रतिमा काळे, मुख्याध्यापक श्री संदीप सपकाळ, प्रा.माने डी वाय पाटील कॉलेजचे सौ .मोनिका शर्मा , श्री अविनाश दांगट ,श्री गोरक्षनाथ सानप श्री सिकंदर घोडके, अथर्व दांगट एक्स सर्व्हिसमन, श्री कुळकर्णी साहेब, श्री रघुनाथ सावंत, श्री विजया जि तिवारी ,श्री .धर्माजी नवले तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.आज सुमारे ११० औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
Discussion about this post