व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी महानगरपालिका तर्फे आयोजित २६वे फुले, फळे, भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व भव्य प्रदर्शन “रानजाई” महोत्सव आजपासून नियोजित महापौर निवासस्थान, निगडी प्राधिकरण येथे सुरू झाला आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा सदस्या अश्विनी जगताप, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, उपायुक्त सुभाष इंगळे , रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी, माजी उप महापौर शैलजा मोरे आदी उपस्थित होते.
Discussion about this post