व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे. राज्यात पुढील आठवडाभर कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
पुणे १४.४ (२१.८), जळगाव १५.०(२०.५), कोल्हापूर १८.६ (२२.६), नाशिक १४.२ (२१.२), सोलापूर १६.९ (२२.५), महाबळेश्वर १२.२ (१७.६), सांगली १६.५ (२१.६), सातारा १४.६ (२१.८), मुंबई २३.८ (२६.०), सांताक्रुझ २०.६ (२६.०), रत्नागिरी १९.२ (२४.६), औरंगाबाद १४.१ (२१.१), परभणी १७.० (२३.५), अमरावती १५.३ (१९.५), गोंदिया १७.८ (२०.०), नागपूर १७.० (२१.१), चंद्रपूर १८.० (२३.०)
Discussion about this post