व्हीएसआरएस मराठी न्युज-जयपूर (ता.माेताळा) दि- २७ जुलै २२ (बुधवार) :- येथे आज मा. आमदार हर्षवर्धनदादा सपकाळ भेट दिली. पाणी फाऊंडेशनच्या सहयाेगातुन ग्रामस्थांनी श्रमदानातुन केलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी गावकरी मंडळीचे काैतुक करत “जयपूर गावकऱ्यांनी भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात श्रमदान करून पाण्याची पातळी वाढवावी अश्या शुभेच्छा दिल्या.
आमदार असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी या गावात ६४ हजार वृक्षांची लागवड केली हाेती. आज ती झाडे बघुन आनंद व्यक्त केला. युवा नेते इरफान पठाण, सरपंच विक्रम देशमुख, किशाेर नावकर यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित हाेती.
Discussion about this post