व्हीएसआरएस मराठी न्युज प्राधिकरण-प्राधिकरण, निगडी येथील भेळ चौकाजवळच्या जागेत मोठ्या प्रमाणात खोदकाम करून उत्खनन करण्यात आले आहे. तेथील मुरूम काढून त्याची विक्री करण्यात येत आहे. त्या जागेचा पंचनामा करून संबंधित बांधकाम व्यावसायिकासआकुर्डीच्या अप्पर तहसिल कार्यालयाने नोटीस बजावली आहे.
खासगी जागेत ५० ते ६० फूट खोल खड्डा खडून मोठ्या प्रमाणात मुरूम काढले जात आहे. त्याची विक्री केली जात आहे. या खोदकामास जिल्हाधिकारी कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका व इतर विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित खोदकाम थांबवून, बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी तक्रार भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी जिल्हाधिकारी, अप्पर तहसिल कार्यालय, महापालिका व पोलिस आयुक्तालयाकडे केली होती.
तक्रारीची दखल घेऊन अप्पर तहसिल कार्यालयाच्या वतीने नुकताच पंचनामा करण्यात आला आहे. योग्य खुलासा न केल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे, असे तहसिलदार ढमाल यांनी सांगितले.
Discussion about this post