व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरण विभागातर्फे जागतिक जल दिनानिमित्त ‘जलयुक्त पिंपरी चिंचवड शहर’ कार्यक्रमाचे मंगळवार, दि. 22 मार्च 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
मोरया गोसावी मंदिर, चिंचवड येथे सकाळी ८ वाजता नदी स्वच्छता अभियान होणार आहे. यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सामाजिक संस्था यांचा सहभाग राहणार असून पवना नदीकाठ स्वच्छता व पवना आरती करण्यात येणार आहे.
तसेच, माहिती, जनजागृती व सांस्कृतिक करमणूक कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
Discussion about this post