व्हीएसआरएस मराठी न्युज -मावळ तालुका व पिंपरी- चिंचवड शहराची तहान भागविणारे व मावळातील शेती फुलविणारे प्रमुख असलेले पवना धरण 76.22 टक्के भरले आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
पवना धरण परिसरात मंगळवार (दि.24) दिवसभरात 46 मिलीमीटर पाऊस झाला असून धरण परिसरात 1545 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तर मागील वर्षी आजच्या तारखेला 37.85 टक्के इतका पाणी साठा होता. या वर्षी जवजवळ 712 मिमी पाऊस जास्त झाला असून धरण 76 टक्के भरले आहे.
जुलै महिन्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. अवघ्या पंधरा दिवसात धरणात 50 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. पाऊस लांबणीवर गेल्यामुळे परिसरात भात लावणी रखडली होती.
मुसळधार पावसामुळे तीही पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून तालुक्यात पाऊसाचा पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी डोंगर भागातून वाहणारे धबधबे, नैसर्गिक जलस्त्रोत खळाळते झाल्याने दिवसेंदिवस पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पवना धरण 76.22 टक्के भरल्याने पिण्याची पाण्याची चिंता मिटल्यामुळे नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.
पिंपरी – चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
Discussion about this post