व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरातही पावसाचा जोर वाढू लागला आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
पवना धरणातील परिस्थिती आजची.
आज धरणातील पाणीसाठा = ८६.३४ टक्के
गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ११० मि.मी.
यावर्षी झालेला एकूण पाऊस = १८३१ मि.मी.
गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणातील पाणीसाठा = ९४.१७ टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस = १९७२ मि.मी.
Discussion about this post