व्हीएसआरएस न्युज पुणे-कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने आरोग्य सुविधांसाठी मोठे काम केले. दोन जम्बो रुग्णालय उभारण्यासह महापालिकेच्या रुग्णालयांचे सक्षमीकरण केले. आॅक्सिजन प्लांट उभारले, खासगी रुग्णालयात बेड न मिळाल्याने, आॅक्सिजन संपल्याने आणीबाणीच्या स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
एकीकडे कोरोनाची तयारी तर दुसरीकडे अवघ्या काही महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी अभ्यासवर्ग ही सुरू आहेत. असे असताना दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले महापालिकेला भेट दिली होती. त्यानंतर नुकत्याच मंत्री झालेल्या डॉ. भारती पवार पुणे महापालिकेत येऊन कामाचा आढावा घेणार आहेत.
महापालिकेने आता तिसऱ्या लाटेसाठी सुद्धा तयारी करून ठेवली आहे. याचाच आढावा घेण्यासाठी डॉ. भारती पवार सोमवारी १२ महापालिकेत बैठक घेणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Discussion about this post