व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 3 हजार 537 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 824 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 274 ॲक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये 28 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 246 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.4) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.आज दिवसभरात 4 हजार 668 जणांना लस देण्यात आली आहे.आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 35 हजार 046 जणांना लस देण्यात आली आहे
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 525 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात आज नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 992 रुग्णे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 206 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 5211 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 582 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
राज्यात आज नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 15 हजार 711 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के आहे. सध्या राज्यात 28,878 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 595 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 81 लाख 38 हजार 182 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
Discussion about this post