व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी शहराच्या विविध भागातील 220 नवीन कोरोना बाधित रुग्णांची गुरुवारी नोंद झाली.
शहरातील आजपर्यत 4 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 63 553 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली.
सध्या 1 458 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 414 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
महाराष्ट्रात आज २६७८ रुग्ण आणि ८ मृत्यू यांची नोंद झाली तर ३२३८ जण बरे झाले. राज्यात १९४१३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ९५ हजार ७२९ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख २८ हजार ३५२ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २२ लाख ६३ हजार ४८२ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ९५ हजार ७२९ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८५ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९१ टक्के आहे.
Discussion about this post