व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 51 रुग्ण बरे झाले आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 264 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 710 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 363 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 458 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 44 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 414 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी (दि.28) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 65 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 19 हजार 658 जणांना लस देण्यात आली आहे.
Discussion about this post