व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -कोरोना संसर्ग झालेले ७७ रुग्ण बुधवारी (ता. २३) शहरात आढळले. आतापर्यंत तीन लाख ५८ हजार ४२८ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज १६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आजपर्यंत तीन लाख ५३ हजार ६३९ जण बरे झाले असून चार हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६५ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ८३६ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण ९०१ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३४ लाख तीन हजार ८८८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज २४७ घरांतील ७५२ नागरिकांची तपासणी केली. सध्या २६ मेजर व ८३३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
पुणे शहरात आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रावर 3596 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 188 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 72 हजार 692 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 59 हजार 653 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 48 हजार 540 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण शहरातील आहेत.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 773 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 106 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 13 तर नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 10 रुग्ण आहेत.
एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 20.02 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Discussion about this post