व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –शहरामध्ये गोवरचे बाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आत्तापर्यंत 2 हजार 538 बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले आहे.
तर, 20 हजार 562 बालकांना ‘व्हिटॅमिन ए’ची मात्रा देण्यात आली आहे.
महापालिका वैद्यकीय विभागाकडून गोवर लसीकरण आणि पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत 5 वर्षांखालील 36 हजार 435 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून आजअखेर गोवरचे एकूण 339 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी गेल्या 11 महिन्यांत 8 जणांना गोवरची लागण झाली आहे.
Discussion about this post