व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिकेच्या आकुर्डी येथील नवीन कै. प्रभाकर कुटे रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांशी उद्धटपणे वागत आहेत. औषधी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने बाहेरून अवाच्या सव्वा दराने औषधी खरेदी करावी लागत आहेत. गरोदर महिलांना महिला कर्मचारी योग्य वागणूक न देता अपमान करून तिष्टत ठेवतात. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मनसे नेते किशोर कांबळे रुग्णालयात जाऊन समक्ष पाहणी केली असता कर्मचारी रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांसोबत उद्धटपणे वागत असल्याचे आढळले.
रुग्णालयातील असुविधा व कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीबाबत जनसंवाद सभेत लेखी तक्रार दिली होती. त्यावर अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकायांना पत्र पाठवू रुग्णांना चांगले उपचार व सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. – के. के. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले .
रुग्णालयात येणाऱ्या रुणांना योग्य वागणूक देण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयातील दंतचिकित्सा विभाग आवश्यक सुविधा व साधने उपलब्ध नसल्याने बंद होता; परंतु सध्या आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने तो सुरु करण्यात आला आहे. गरोदर महिलांना सन्मानाने वागणूक द्यावी अशी ताकीद महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. – डॉ. बाळासाहेब होडगर,
वैद्यकीय अधिकारी
Discussion about this post