व्हीएसआरएस मराठी न्युज –भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्यातर्फे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सेवा सप्ताह मध्ये आनंदघन वृद्धाश्रम स्पाईन रोड, त्रिवेणीनगर या ठिकाणी अनाथ,निराधार, वृद्ध व मनोरुग्ण महिलांना ब्लॅंकेट वाटप व कपडे वाटप करून साजरा करण्यात आला,
याप्रसंगी आनंदघन वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा निशाताई रसाळ, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेशभाऊ रासकर, भाजपा ओबीसी युवक मोर्चा शहराध्यक्ष राजेशभाऊ डोंगरे, भाजपा ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्ष जयश्रीताई देशमाने, प्रा.नितीन साळी (सरचिटणीस भाजप ओबीसी युवक मोर्चा पिंपरी चिंचवड शहर) विमलताई काळभोर (प्रभाग अध्यक्ष यमुना नगर निगडी) जयश्रीताई मकवाना (निगडी चिखली मंडळ उपाध्यक्ष) लताताई हिंदळेकर (उपाध्यक्ष भाजप ओबीसी महिला मोर्चा) सामाजिक कार्यकर्ते मुकेश व्हणवटे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेशभाऊ रासकर यांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली आनंदघन वृद्धाश्रमास भविष्यात मदत करण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत पुढील सात दिवसांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Discussion about this post