व्हीएसआरएस मराठी न्युज -महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांबरोबर नातेवाईकांना रुग्णालयात व त्याचा आवारात फरशीवर झोपवले जात आहे.
विशेषतः लहान मुले ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग रुग्णालयात काळजी पोटी उपस्थित असतात.त्यांना रुग्णालयात बाहेर फरशीवर झोपावे लागत आहे तसेच त्यांना दिले जाणरे जेवण निकृष्ट दर्जाचे असून स्वच्छता राखली जात नाही.ही परिस्थिती गंभीर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील साहेब यांनी स्वतः यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जाऊन रुग्णालयात रुग्णांबरोबर आलेल्या नातेवाईक ह्यांची हेळसांड होत आहे ह्या परिस्थिती ची पाहणी करावी.स्मार्ट सिटी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची गणना केली जाते.पण सुविधा उपलब्ध नाहीत.यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सर्व पुणे जिल्हाच्या भागातील नागरिक उपचार घेण्यासाठी येत आहे.त्यांच्या बरोबर असणारी नातेवाईकांची राहण्यासाठी सोय उपलब्ध नाही.त्यांना फरशीवर झोपावे लागत आहे.रुग्णांचा देखभालीसाठी रुग्णालयात त्यांना मुक्काम करावा लागतो.परंतु सुरक्षा रक्षक रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना जाणून बुजून त्रास देत आहेत.त्यामुळे रुग्णालयात त्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे.
ह्या वरील सर्व संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर उपाय योजना करावी.अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष यांनी आयुक्त व यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील प्रमुख…..
यांच्या कडे मागणी केली आहे.
अन्यथा १६/५/२०२२ रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मुख्य दरवाजा ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन काळभोर यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
Discussion about this post