व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गट ब आणि क संवर्गाच्या ऑनलाईन भरतीचे सर्व टप्प्यांचे कामकाज खाजगी कंपनीला देण्यास आणि त्यासाठी येणा-या खर्चास आज प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पोस्ट ग्रॅज्युवेशन संस्थेच्या नेत्ररोग विभागासाठी आवश्यक उपकरणे खरेदीकामी ५५ लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी आवश्यक सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. या साहित्य खरेदीकामी येणाऱ्या ११ कोटी रुपये खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. तसेच तरतूद वर्गीकरणाच्या विषयांसह इतर विविध विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यास देखील प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
Discussion about this post