व्हीएसआरएस मराठी न्युज –आजपासून देशभरात दोन दिवसीय कोरोना मॉक ड्रिल सुरू होणार आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून सोमवारी आणि मंगळवारी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला जाईल.
ही मॉक ड्रील सरकारी आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये होणार आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज एम्स झज्जरला भेट देणार आहेत.
रविवारी हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 137 नवीन रुग्ण आढळले, तर 4 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शिमला जिल्ह्यात 3 जणांचा, तर सिरमौर जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 1,764 वर गेली आहे.
रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 788 नवीन रुग्ण आढळून आले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात 560 जण कोरोनाने बरे झाले. सध्या येथे कोरोनाचे 4,587 सक्रिय रुग्ण आहेत.
दुसरीकडे, राजस्थानमध्ये 165 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. येथे 651 सक्रिय रुग्ण आहेत.
Discussion about this post