व्हीएसआरएस मराठी न्युज -जपानचे वायरॉलॉजिस्ट डॉ. मिचियाकी ताकाहाशी असं या डॉक्टरांचं नाव. डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचं आज जगभरातील लोक आभार प्रकट करत असतील. कारण कांजण्यासारख्या आजारापासून वाचवण्याचं काम त्यांनी केलं.
म्हणूनच आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुगलकडूनही डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांना अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या आणि गंभीर असलेल्या रुग्णांसाठी एक प्रभावी उपाय म्हणून ताकाशाही यांनी लशीचा शोध लागला. यानंतर जगभरातील लाखों लहानग्यांना ही लस देण्यात आली.
मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1928 रोजी जपानच्या ओसाकामध्ये झाला. त्यांनी ओसाका विद्यापीठातून मेडिकलची डिग्री घेतली. 1959 मध्ये ते ओसाका विद्यापीठात मायक्रोबियल रोग संशोधन संस्थेत रुजू झाले.
गोवर आणि पोलिओवरील लसींचा अभ्यास केल्यानंतर डॉ ताकाहाशी यांनी 1963 मध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या बेयलर कॉलेजमध्ये एक संशोधन फेलोशिप स्वीकारली. या काळात त्यांच्या मुलाला कांजण्याची लागण झाली. यामुळं त्यांना या रोगावर लस शोधण्यासाठी खरंतर मदतच झाली.
त्यानंतर डॉ. ताकाहाशी 1965 मध्ये जपानला परतले आणि प्राणी आणि मानवी ऊतींमधील जिवंत परंतु कमकुवत झालेल्या चिकनपॉक्स विषाणूचे संवर्धन करण्यास सुरुवात केली. केवळ पाच वर्षांच्या विकासानंतर ते क्लिनिकल चाचण्यांसाठी तयार होते. 1974 मध्ये, डॉ. ताकाहाशी यांनी विषाणूला लक्ष्य करणारी पहिली लस विकसित केली. नंतर इम्यूनोसप्रेस्ड झालेल्या रूग्णांवर संशोधन केले गेले आणि ते अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.