व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र पिंपरी, पुणे यांच्या वतीने जागतिक मानवी दुग्ध दान दिनाच्या निमित्त; दाता मातांसाठी पुण्यातील पहिला व्हाईट कार्पेट वॉक आयोजित केला.
व्हाईट कार्पेट वॉक हा अभिनव उपक्रम स्तनपान देणाऱ्या मातांना पुढे येऊन दुग्ध दान करण्यासाठी शिक्षित आणि प्रोत्साहित करण्याच्या उद्दिष्टाने टाकलेले एक पाऊल आहे.
१९ मे २०२३, पुणे: डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी, पुणे येथे यशोदा अॅडव्हान्स्ड ह्युमन मिल्क बँक, व्यापक स्तनपान व्यवस्थापन प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र (CLMTRC) व बालरोग, प्रसूती व स्त्रीरोग आणि सामुदायिक औषध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विशेषतः रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणे, इंडियन मेडिकल असोसिएशन- पिंपरी चिंचवड भोसरी (IMA-PCB) आणि महिला डॉक्टर्स विंग (IMA-PCB WDW यांच्या सहकार्याने दुग्ध दान केलेल्या स्तनदा मातांच्या सन्मानार्थ ‘व्हाईट कार्पेट वॉक’चे आयोजन करून जागतिक मानवी दुग्ध दान दिन साजरा केला.
या कार्यक्रमाला डॉ अनिरुद्ध टोणगांवकर, डॉ दिपाली टोणगांवकर ,डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र. कुलपती व डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे डॉ. जे. एस. भवाळकर, अधिष्ठाता, डॉ शैलजा माने बालरोग विभाग प्रमुख, डॉ एच. एच चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, तसेच विभाग प्रमुख, प्राध्यापक, दुग्ध दान करणाऱ्या माता आणि अन्य आरोग्य सेवा कर्मचारी उपस्थित होते.
व्हाईट कार्पेट वॉकमध्ये ४० हुन अधिक दुग्ध दान करणाऱ्या माता सहभागी झाल्या होत्या. यानंतर दुग्धदाता मातांचा सत्कार समारंभ आणि मानवी दूध दानाचे महत्त्व आणि मातांसाठी त्याचे फायदे यावर जनजागृती करण्यात आली.
काही अभ्यासानुसार, भारतातील प्रत्येक १० पैकी १ महिला विविध कारणांमुळे त्यांच्या बाळाला स्तनपान करण्यासाठी पुरेसे दूध तयार करू शकत नाही. त्यामुळे लोक इतर पर्यायी पोषण घटकांचा अवलंब करतात परिणामी, याचा परिणाम मुलाच्या संपूर्ण संगोपनावर होतो. म्हणून ‘ह्युमन मिल्क बँक’ या मातांच्या बाळांना आईच्या दुधाद्वारे मिळणाऱ्या पोषणमूल्यांपासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न करते.
या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना, डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र. कुलपती, डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ म्हणाल्या, “आम्हाला जाणवले की आपल्या समाजात आईच्या दुधापासून वंचित राहणाऱ्या नवजात बालकांचे सर्वांगीण पोषण ही गंभीर चिंता असून ती वणव्यासारखी पसरत आहे आणि तेच लक्षात घेऊन आम्ही पुण्यातील पहिली मातृ दुग्ध पेढी सुरुवात केली. हा उपक्रम मानवी दूध दान संकल्पनेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि सक्षम मातांनी पुढे येऊन या कार्यात सामील होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. आम्ही हॉस्पिटलमध्ये नेहमीच समाज उपयोगी उपक्रमांना पाठिंबा देत असतो. या माध्यमातून नवजात बाळासाठी आमची मातृदग्ध पेढी वरदान ठरली आहे”
डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने म्हणाल्या, “भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहे आणि त्यामुळे अकाली बाळांच्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. तथापि, अकाली जन्मलेल्या बाळांच्या दुधाची पूर्तता करण्यासाठी भारतात उपलब्ध असलेल्या मिल्क बँकांचे प्रमाण अत्यंत विषम आहे आणि भारतातील मेट्रो शहरांमध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. दुसरं म्हणजे पुणे आणि देशभरात दुग्धदानाबाबत जनजागृती फारच कमी आहे. हा उपक्रम समाजाला आईच्या दुधाच्या दानाचे महत्त्व आणि फायदे याविषयी शिक्षित करण्यावर आणि स्तनदा मातांना या उपक्रमात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर केंद्रित आहे”.
दुग्धदान करणाऱ्या आईची टिप्पणी:
दुग्धदान करणारी माता श्रुती औंधकर म्हणाल्या, दूध दानाचे महत्व मला डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रामध्ये उत्तम रित्या समजावून सांगण्यात आले. त्यामुळे आज त्याचे महत्व ओळखून न लाजता गरजू बाळांना दूध दान करण्याचे ठरवले. ह्या रुग्णालयात दुधाचे संकलन ते दूध साठवण्याची प्रक्रिया खूप सुलभ आहे. दूध हि देवाची देणगी आहे ती वाया घालवू नका, त्याऐवजी ते दान करून तुम्ही इतरांना जीवनदान देऊ शकता. मी आज दोन मुलांची आई आहे परंतु दूध दान करत असल्यामुळे आज अनेकांची आई झाल्याचे समाधान मिळत आहे आणि ते मी अभिमानाने सांगते. आज माझा रुग्णालयाने सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.
या कार्यक्रमाला डॉ.पी.वत्सलास्वामी शैक्षणिक संचलिका डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेच्या अध्यक्षा सौ.प्रणिता आलुरकर, डॉ.शुभांगी कोठारी, माजी अध्यक्ष आणि श्री.रवी राजापूरकर, प्रकल्प समन्वयक रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे, डॉ.अनुरुद्ध टोणगावकर, सचिव IMA PCB,
डॉ. रितू लोखंडे, अध्यक्ष, WDW IMA PCB आणि पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post