व्हीएसआरएस मराठी न्युजआळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे) मागील गेल्या काही वर्षांपासून सिद्धबेटाजवळील केळगाव हद्दीतील गटाराचे सांडपाणी सिद्धबेटातील संरक्षण भिंत तोडून सिद्धबेटात सोडले होते.हे गटाराचे सांडपाणी सिद्धबेटामध्ये सोडल्यामुळे तेथे चालण्यासाठी असणाऱ्या दगडी जॉगिंग ट्रॅकवर ही येत होते.
येथील आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ते साठत होते.त्यामुळे येथे येणाऱ्या अनेक भाविकांना, पर्यटकांना चालण्यासाठी येथे कसरतच करावी लागत असे .पर्यटकांना या गटारीच्या सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्रास ही सहन करावा लागत असे.सामाजिक कार्यकर्त्यांच्या,नागरिकांच्या तक्रारी,काही पक्षांच्या त्याबाबत निवेदनांची ,वृत्तांची दखल घेत प्रशासनाने तेथील समस्या सोडवण्यासाठी नवीन
ड्रेनेज लाईन तयार करून सिद्धबेटातील ती
समस्या मिटवली असल्याने आता त्या गटारीच्या सांडपाण्याचा दुर्गंधी युक्त वासाचा कोणालाही त्रास ही नाही. तसेच त्या जॉगिंग ट्रॅकवर चालणे ही आता सोपे झाले आहे. गुरुवार दि.२१ला आळंदी नगरपरिषदे तर्फे सिद्धबेटातील परिसराची स्वच्छता ही करण्यात आली.
सिद्धबेट ही माऊलींची कर्मभूमी असून संत निवृत्तीनाथ,संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या तसेच पूर्वी ऋषि मुनींनी तप केलेल्या या भूमीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून अनेक पर्यटक व भाविक या सिद्धबेटात येत असतात.सध्या तेथील दगडी जॉगिंग ट्रॅकवर गटाराच्या सांडपाण्यापासून सुटका झाल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे आळंदीकर नागरिक व येथील रहिवासी ही या प्रशासनाच्या कामावर खुश झाले आहेत.
Discussion about this post