व्हीएसआरएस मराठी न्युज –दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘जागतिक दमा दिवस’ साजरा केला जातो. यावर्षी २ मे रोजी वर्ल्ड अस्थमा डे साजरा केला जाणार आहे.
दमा हा श्वसनाच्या गंभीर आजारांपैकी एक आहे. हा आजार फुफ्फुसावर हल्ला करून श्वासावर परिणाम करतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दम्यामुळे ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांनी त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
जागतिक दमा दिन’ साजरा करण्याची सुरुवात १९९३ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमाने केली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते असा अंदाज आहे की जागतिक स्तरावर ३३९ मिलियन पेक्षा अधिक लोक दम्याने ग्रस्त आहेत तर २०१६ मध्ये जागतिक स्तरावर अस्थमामुळे ४१७,९१८ मृत्यू झाले आहेत.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील लोकांमध्ये अस्थमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी थीम ठरवण्यात आली आहे. जागतिक दमा दिन २०२३ ची थीम ‘सर्वांसाठी दम्याची काळजी’ ही आहे. दमा रूग्णांचे जीवनमान वाढवणे आणि सुधारणेयावर लक्ष केंद्रित केले जाईल
Discussion about this post