व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -: कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस (प्रिकॉशन डोस) महापालिकेतर्फे मोफत दिला जाणार आहे. त्यासाठी आठ केंद्रांवर व्यवस्था केली असून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचे प्रत्येकी चार हजार प्रमाणे आठ हजार आणि मुलांसाठीच्या कोर्बेव्हॅक्स लसीचे ४ हजार असे १२ हजार डोस दररोज उपलब्ध असतील.
कोविशिल्ड : पहिला डोस घेऊन १२ ते वेळ १ ,१६ आठवडे अर्थात ८४ ते ११२ दिवस झालेल्यांना दुसरा डोस मिळेल
कोबॅव्हॅक्स व कोव्हॅक्सिन : पहिला
२ डोस घेऊन २८ दिवस अर्थात चार आठवडे झालेल्यांना दुसरा डोस मिळेल
३ बूस्टर किंवा प्रिकॉशन डोस लसीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्यांना मिळेल
लसीकरणाचीवेळ
■ लसीकरण वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी ४.३०
■ कोविन अॅपवर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करावे
गर्भवती, दिव्यांग, ज्येष्ठ, तृतीयपंथी यांना प्राधान्य
■ साप्ताहिक सुटीमुळे प्रत्येक रविवारी लसीकरण बंद
लसीकरण केंद्र
महापालिकेने कुठे हॉस्पिटल आकुर्डी, जूने तालेरा रुग्णालय चिंचवड, नवीन थेरगाव रुग्णालय, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, होळकर शाळा जुनी सांगवी, वायसीएम हॉस्पिटल संत तुकारामनगर पिंपरी (कुटुंब कल्याण विभाग, खोली क्रमांक ६२] या केंद्रांवर लसीकरण व्यवस्था केली आहे.
कोव्हॅक्सिजन, कोविशिल्डचा बुस्टर डोस
महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसींच्या साठ्यानुसार १२ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आठ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली असून, सरकारच्या सूचनांनुसार कोर्बेव्हॅक्स, कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसींचे पहिला व दुसरा आणि कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसींचे बूस्टर डोस दिले जात आहेत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी
Discussion about this post