व्हीएसआरएस मराठी न्युज भोसरी-भोसरी येथील विविध शाळांमध्ये मोफत नेत्र तपासणी भोसरी परिसरातील विद्यार्थ्यांना या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी अजितभाऊ गव्हाणे युवा मंच व मित्र परिवार, भारती विद्यापीठ, माई मेडिकल फाउंडेशन यांच्या सहकार्याने सदर शिबीराचे आयोजन केले होते.
संत ज्ञानेश्वर शाळा, न्यू इंग्लिश स्कुल, सिद्धेश्वर इंग्लिश स्कुल, या तिन्ही शाळांमध्ये चौथी ते दहावीपर्यंतच्या जवळपास १४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नंबर असल्याचे आढळून आले आहे.
विद्यार्थ्यांसमवेत शिबिरात सहभागी होऊन आपले डोळे तपासून घेतले. शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांनी यावेळी आरोग्याचे महत्व सांगितले, ‘डोळा हा आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर वाढला आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे डोळ्यांचे आजार वाढले आहेत. पुढे त्यांनी नमूद केले की, डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे आहे ते डोळ्यांची तपासणी वेळोवेळी करत राहणे व आवश्यक ती काळजी घेणे.
डॉ. संदिप फडतरे, डॉ. अमर भोईटे, डॉ. सलोनी चौधरी, डॉ. साई किरण तसेच स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सतीशचंद्र जकाते साहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दादा पोकळे इत्यादी मान्यवर, गंगोत्री पार्क मित्र परिवार, पालक, तसेच विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिकचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post