व्हीएसआरएस मराठी न्युज -आमदार पे महेशदादा लांडगे युवा मंच दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने कुदळवाडी महापालिका शाळेत मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व कंपास बॉक्स वाटप करण्यात आले.
शाळकरी लहान मुलं ही आपल्या देशाचे भविष्य आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही पिढी सुदृढ व सक्षम व्हावी या उद्देशाने दिनेश यादव मित्र परिवार व व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमातून कुदळवाडी येथील महापालिका शाळेतील मुलांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत या शाळेतील सर्व मुलांचे डोळे तपासण्यात आले व आवश्यक त्यांना चष्मे वाटप करण्यात आले.
Discussion about this post