व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-महापालिकेच्या प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी यांच्या साहायाने पोलिस बांधवांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर निगडी पोलिस ठाणे मध्ये संपन्न झाले.
सदर शिबिराचे उद्घाटन निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकुर्डी महापालिका हॉस्पिटलचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल फरांदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक उत्तम ओमासे, पोलीस उप निरिक्षक नाथा केकान, पोलिस नाईक रुपेश गैंगजे, पोलीस कॉन्स्टेबल सोपान बोधवड, नानासाहेब पिसाळ, रज्जाक मणियार आदी उपस्थित होते. यावेळी बहुतांशी पोलिसांनी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घेतली. रक्तामधील साखर, रक्तदाब, केलेस्टेरॉल, हिमोग्राम, थोयराईड आदींची तपासणी करण्यात आली. तसेच महिला पोलिसांसाठी त्यांच्या दैनंदिन शारीरिक समस्या बाबत चर्चासत्राद्वारे विशेष आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आकुर्डी महापालिका हॉस्पिटलचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल फरांदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक उत्तम ओमासे, पोलीस उप निरिक्षक नाथा केकान, पोलिस नाईक रुपेश गेंगजे, पोलीस कॉन्स्टेबल सोपान बोधवड,आदी उपस्थित होते.
Discussion about this post