व्हीएसआरएस मराठी न्युज-आदर्श शिक्षण संस्था, दिघी रोड येथे महानगरपालिका तर्फे कचरा कन्फ्युज गेम घेण्यात आले.
प्रमुख उपस्थिती :नगरसेविका श्रीमती प्रियंका ताई बारसे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले.
कचरा कन्फ्युज गेम चे नियम (20 विद्यार्थ्यांनी भाग घेतला)
1. गोल सर्कल मारण्यात आले
2. ओला कचरा गोल, सुका कचरा गोल मध्ये जो विद्यार्थी जाईल, त्या विद्यार्थ्याला विजेता घोषित करण्यात आले. (ओला कचरा, सुका कचरा)
विजयत्याला तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
बेसिक्स टीमकडून स्पर्धा ठेवण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार समजले जातील व कुठल्या कचऱ्यासाठी कुठला डस्टबिन वापरला जातो हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अशाप्रकारे स्पर्धा घेण्यात आली. अशा गेम मधून मुलांचा उत्साह वाढवण्यात आला व स्वच्छते प्रति विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
Discussion about this post