व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड आयुक्त हस्यांते च्या हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखानाचा उद्घाटण करण्यात आले.
राज्यातील सरकारने सामान्य नागरिकांना नवनवीन विविध सुखसुविधा पायाशी आणून ठेवल्या आहेत. अशातच आता नागरिकांसाठी आणखीन एक आनंददायी बातमी समोर येते. आता राज्यात १ मे पासून हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे.
अशातच निःशुल्क औषधी उपचार, मलमपट्टी, वैद्यकीय तपासणी अशा प्रकारच्या १४७ चाचण्यांची सेवा मिळणार आहे. सरकारी रुग्णालयावरही आता तासंतास उभा राहायची गरज नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या आधारे महाराष्ट्रात ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राज्यात राबवली जाणार आहे. यामुळे राज्यात एकूण ७०० दवाखाने उभारण्यात येणार आहे.
या दवाखान्यात असंसर्गिक रोग नियंत्रण, दररोज रुग्ण तपासणी, लसीकरण, माता बाल संगोपन यावर उपचार केले जातील. रक्त, लघवी तपासणी या ठिकाणी केली जाते. तसेच बाह्यरुग्ण विभागाची सुविधा देखील या ठिकाणी असणार आहे.
Discussion about this post