व्हीएसआरएस मराठी न्युज -सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, विभागाच्या सुचनेनुसार, राज्यात व जिल्ह्यातील १८ वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणीसाठी नवरात्र उत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड़ ( Pimpri Chinchwad ) महापालिकेच्या वतीने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ या मोहिमेचा शुभारंभ २७ सप्टेंबर सकाळी ११:०० वाजता महानगरपालिकेच्या नवीन थेशाव रुग्णालय येथे संपन्न होणार आहे.
या मोहिमेची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय / दवाखान्यामध्ये कार्यरत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका , अंगणवाडी सेविका इत्यादींमार्फत घरोघरी माहिती देण्यात येणार आहे. या निमित्ताने नवरात्रोत्सवात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १८ वर्षावरील युवती, गरोदर महिला मातांची तपासणी करण्यात येणार आहे. ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अशी संकल्पना घेऊन विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
२७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांतर्गत तसेच रुग्णालय कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकिय संचालक तथा अति आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
Discussion about this post