व्हीएसआरएस मराठी न्युज -आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ च्या वतिने आकुर्डी येथे उपयोगकर्ता शुल्क वाढीव बीलाची होळी करण्यात आली. त्यावेळी मनसे नेते के के कांबळे, संघाचे अध्यक्ष आण्णा कुर्हाडे, ज्ञानेश्वर ननावरे, शिवाजी मिसाळ,अतुल शितोळे यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होते.
सोसायट्यांकडून आधीपासूनच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून दिला जातो.
महापालिकेकडून ओला, सुका आणि घरगुती घातक कचऱ्याच्या विलगीकरणापोटी दरमहा ६० व वार्षिक ७२० रुपये शुल्क एक एप्रिलपासून आकारणी केले जाणार आहे. अन्य आस्थापनांकडून ९० पासून २०० रुपयांपर्यंत मासिक शुल्क आकारले येत आहे.
महापालिकेकडे पाच लाख ९३ हजार ८०५ मिळकतींची नोंद आहे. त्यात निवासी मिळकती पाच लाख सात हजार २५४ आहेत. बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र व इतर मिळून ७४ हजार ४८२ मालमत्तांची नोंद आहे. त्यातील निवासी सदनिकांना ६० रुपये; दुकाने, दवाखान्यांना ९० रुपये; शो-रूम, गोदामे, उपहारगृहांना १६० रुपये; लॉज व हॉटेलला २०० रुपये; दवाखाने, रुग्णालयांसाठी १६० ते २४० रुपये; शैक्षणिक, धार्मिक संस्था, सरकारी-निमसरकारी कार्यालयांसाठी १२० रुपये; मंगल कार्यालये, मॉल्स, चित्रपटगृहांसाठी दोन हजार रुपये आणि फेरीवाल्यांकडून १८० रुपये दरमहा कचरा वर्गिकरण शुल्क आकारले जाणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सरासरी ४२१ रुपये दरमहा व वार्षिक पाच हजार ५२ रुपये शुल्क भरावे लागेल.
महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली संपूर्ण शहरातील मिळकतधारकांच्या घरपट्टी पत्रकामध्ये २०१९-२० चा उपयोगकर्ता शुल्क थकबाकी म्हणून ५४० रुपये मिळकतकराच्या बिलात दाखवली आहे. ती वसूल देखील केली जात आहे तसेच दरवर्षीच्या कर मिळकत पत्रिकेमध्ये अश्या प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार आहे. हे सरासर अन्यायकारक असून तत्काळ हा निर्णय रद्द करण्यात यावा. मुळातच अश्या कोणत्याही प्रकारचा कचरा संकलनाचा नावाखाली उपयोगकर्ता शुल्क मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी सारख्या महानगरपालिका घेत नाही, मग आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस अश्या प्रकारचा उपयोगकर्ता शुल्क घेण्याची एवढी घाई का ? शहरातील नागरिक कररूपातून लाखो रुपये कर महानगरपालिकेस भरतात, ते भरून सुद्धा त्यांना महानगरपालिका पुरेश्या मुलभूत सोयी सुविधा देत नाही तसेच प्रशासक राजवटीच्या नावाखाली मनपा विविध कर व शुल्काच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनची लुट करीत आहे.
Discussion about this post