व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी (आयएमए- पीसीबी)च्या अध्यक्षपदी डॉ विजय सातव तर सचिवपदी डॉ हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तसेच खजिनदार डॉ अनिरुद्ध टोणगांवकर यांची नियुक्ती .
नियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
- डॉ विजय सातव( अध्यक्ष)
- डॉ. हेमंत पाटील (सचिव), डॉ. संजीव दात्ये(माजी अध्यक्ष)
- डॉ. सुशील मुथियान(नियोजित अध्यक्ष)
- डॉ. माया भालेराव, डॉ. सुधीर भालेराव
- डॉ.शुभांगी कोठारी (तिघेही उपाध्यक्ष)
- डॉ.अनिरुद्ध टोणगावकर (खजिनदार)
सन 2022-23 ची कार्यकरणी मध्ये निवड झालेल्या सर्व सभासदांची ओळख अध्यक्ष यांनी करून दिली. डॉ दिलीप कामत यांनी प्रास्तविक केले. माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, डॉ जयंत नवरंगे, डॉ सहास पिंगळे, डॉ मंगेश पाटे यांनी मार्गदर्शन केले.
Discussion about this post