व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी महापालिकेने ‘स्वछाग्रह’ मोहिमेची सुरुवात अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे.
आयुक्त म्हणाले या मोहिमेचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे यांची नियुक्ती केली आहे. या मोहिमेसाठी शहराची स्वतंत्र थीम तयार करण्यात आली आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी शहरातील नागरिकांनी शनिवारी (दि.१७) सायंकाळी सहापर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करावी. जास्त संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्यास केंद्र शासनाकडून पुरस्कार दिला जाणार आहे.
या उपक्रमात नदीकाठ, स्मारके आणि टेकड्या स्वच्छ केल्या जाणार आहेत. प्लॉगेथॉन मोहीम निगडीतील दुर्गादिवी टेकडी, सांगवीतील वेताळ महाराज घाट, चिंचवडमधील मोरया मंदिर घाट भारतमाता चौक ते इंद्रायणी नदी घाट, पिंपळे गुरव नदी किनारा, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, थेरगावातील केजूबाई बोट क्लब, भोसरी सहल केंद्र, निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक ते त्रिवेणीनगर या ठिकाणी मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी घरासोबत बाहेरील स्वच्छता पाहून या मोहिमेत सहभागी व्हावे, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
(प्लॉगेथॉनसाठी आयोजित स्थळे)
.वेताळ महाराज घाट, जुनी सांगवी
•मोरया गोसावी मंदिर, चिंचवडगाव
• दुर्गा देवी उद्यान निगडी
• पिंपळे गुरव विसर्जन घाट ते डायनोसॉर पार्क
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह
• भारतमाता चौक ते इंद्रायणी नदी घाट
कैजू देवी बोट क्लब एरिया, थेरगाव पी.सी.एम.सी डेपो सदगुरू नगर
• त्रिवेणीनगर चौक ते भक्ती-शक्ती चौक
• भोसरी सहल केंद्र
शनिवार दि. १७ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.३० ते ११.०० वा.
पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून कृतीशील राहावे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. निरंतर शाश्वत विकास साधण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमांमधून निर्माण होणारा कचरा आपणच स्वच्छ केल्यास शहराचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होईल, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.
Discussion about this post