व्हीएसआरएस मराठी न्युज –आमदार माधुरी मिसाळ यांनी विधांनसभेत किडनी रॅकेटविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या रॅकेटमधील मुख्य आरोपी फरार असून ही एक संघटित गुन्हेगारी आहे आणि या रॅकेटचे लोण आता संपूर्ण महाराष्ट्रांत पसरल्याचे मिसाळ यांनी निदर्शनास आणले.
किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, येत्या तीन महिन्यात यासंदर्भात अहवाल देण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे.
धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत रुग्णालयांमध्ये पन्नास टक्के सवलत किंवा मोफत सवलतीच्या दरांत अल्प उत्पन्न किंवा गरीब नागरिकांवर करण्यात येणारे उपचार यांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षक अधिकारी यांच्या मार्फत परीक्षण करून या रुग्णालयावर कारवाईची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे.
Discussion about this post