व्हीएसआरएस मराठी न्युज –स्वाईन फ्लूचे उच्चाटन होत नाही, तोच गोवर या दुसऱ्या संसर्गजन्य आजाराची साथ आली असून मुंबईत, तर तिने कहर केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही ती येण्याची भीती आज दि.२५ रोजी
मुख्य वैद्यकीय अधिकारी.डॉ. पवन साळवे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापालिकामार्फत शहरातील भागात राबविण्यात येणाऱ्या गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी स्वी सदस्य श्री दिनेश लालचंद यादव यांच्या जनसंपर्क कार्यालय कुदळवाडी येथे बैठक घेतली.
त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.उद्योगनगरीसह पुण्यातही वेगाने पसरणाऱ्याा गोवर आजाराने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात पसरल्यास अनेक लहान बालकांच्या जिवाला धोका ठरू शकतो, याकडे त्यामुळे या आजाराबाबत निष्काळजीपणा करून चालणार नाही,असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला आहे. या आजारावर अद्याप कोणतेही औषध नसल्याने लस देणे हा एकमेव पर्याय आहे. तसेच तो झाल्यानंतर केवळ त्याची लक्षणे नियंत्रित करून उपचार केले जातात. त्यामुळे या रोगाला तातडीने प्रतिबंध करण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्वतंत्र गोवर आयसोलेशन कक्ष प्रशासनाने तयार करण्याची नितांत गरज.
मुलांचे लसीकरण करण्यासाठी जनजागृती करा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्व्हेक्षण करुन संशयित लक्षणं असणारे मुलांवर लक्ष ठेवा, अशा सूचना . डॉ.पवन साळवे, यांनी आज कुदळवाडीतील सर्व डॉक्टर यांना
रोगप्रतिबंधक उपाययोजना व घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीस आकुर्डी हाॅस्पीटल चे डॉ बाळासाहेब होडकर डॉ राहुल साळुंखे स्वी सदस्य दिनेश यादव व कुदळवाडीतील सर्व डॉक्टर उपस्थित होते
Discussion about this post