व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 153 रुग्ण बरे झाले आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 029 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 67 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 555 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 153 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 093 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 573 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 55 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 518 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 6316 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 10 हजार 402 जणांना लस देण्यात आली आहे.
Discussion about this post