व्हीएसआरएस मराठी न्युज –आकुर्डी – ३१ जुलै २२ (रविवार) :- स्व. जावेद शेख यांच्या पुण्यस्मरन दिनानिमित्त आज आकुर्डी येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते.
सदर उपक्रमामध्ये भव्य रक्तदान शिबिर (प्रत्येक रक्तदान आकर्षक भेटवस्तू), मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर, मोफत सर्वांसाठी रक्त तपासणी (आवश्यक असणाऱ्या सर्व रक्त चाचणी), महिलांसाठी मोफत थायरॉईड चाचणी यासह आकुर्डी परिसरात वृक्षारोपण, कार्यक्रम स्थळी वृक्ष वाटप करण्यात आले.
सदर शिबिर हे नगरसेवक जावेद शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ विठ्ठलवाडी आकुर्डी आयाेजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी डॉ. राहुल साळुंखे वैद्यकीय अधिकारी,डॉ. रितिका सिंग,श्री. आकाश बुर्से,श्रीम. निलम फार्मासिस्ट गायकवाड, श्री. प्रतिक्षा गुरव,श्रीम, शितल खांडेकर,श्रीम. माया गिरी.ए.एन.एम.
श्रीम. निकिता ,श्री. संदीप जगताप,श्री. भारती गजानन,विकास क्षिरसागर,जगताप एक. आर. यांनी माेलाचे सहकार्य केले.
सदर कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसाेडे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम, नगरसेवक राजु मिसाळ यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी भेट दिली.
Discussion about this post